देश

‘या’ नेत्याची जीभ घसरली, निर्मला सीतारमण यांची केली काळ्या नागिणीशी तुलना

Union Finance Minister Nirmala Sitharaman addresses a press conference in the capital New Delhi on saturday. Express Photo by Tashi Tobgyal New Delhi 140919

कोलकाता | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करताना पश्चिम बंगालमधील तृणमूल नेते कल्याण बॅनर्जी यांची जीभ घसरली आहे. सीतारमण यांची तुलना बॅनर्जी यांनी थेट काळ्या नागिणीशी केली आहे.

काळी नागिण चावल्यामुळे ज्याप्रकारे लोकांचा मृत्यू होतो, त्याच प्रकारे निर्मला सीतारमण यांच्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. त्यांच्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, असं म्हणत कल्याण बॅनर्जी यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

सीतारमण यांना लाज वाटली पाहिजे आणि सीतारमण यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. त्या इतिहासातील सर्वात वाईट अर्थमंत्री आहेत, अशी टीका कल्याण बॅनर्जी यांनी केली आहे.

दरम्यान, कल्याण बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सेरामपूर मतदारसंघातून खासदारकी मिळवली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

BSNL चा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन; दररोज मिळणार 5 जीबी डेटा

पंकजा मुंडे यांना केंद्रात ‘हे’ पद मिळण्याची शक्यता!

महत्वाच्या बातम्या-

‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल- अनिल परब

वाट्टेल ती किंमत मोजून ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण …- संजय राऊत

कोरोना संशयित रूग्णाचा मृतदेह तब्बल ३ तास एसटी आगारात पडला, लाजीरवाणं कृत्य…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या