बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! पुणेकरांचं कोरोना मुक्तीकडे पहिलं पाऊल, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 177 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 514 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 26 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 11 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 625 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,72,431 इतकी आहे. तर पुण्यात 3943 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8410 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,60,078 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 4775 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखीन कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या- 

भर मंडपात नवरदेवाचे फाडले कपडे अन्…; व्हायरल झाला व्हिडीओ

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“लसीबाबत शंका उपस्थित करणारे भोळ्याभाबड्या बहीण-भावांच्या जीवनाशी खेळ करत आहेत”

ब्रेकिंग! पुण्यात सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, पाहा व्हिडीओ

देशातील खासगी रुग्णालयात ‘या’ किंमतीपेक्षा अधिक किमतीत लस विकता येणार नाही; पंतप्रधानांची घोषणा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More