देश

शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावं अन्यथा…- उदयनराजे भोसले

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घातलं पाहिजे. अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल, असा इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या खटल्यात राज्य सरकारचे वकील व्यवस्थितपणे बाजू मांडताना दिसत नाहीत. त्यामुळे आता शरद पवार यांनी या सगळ्यात वैयक्तिकरित्या लक्ष घालून राज्य सरकारला सूचना दिल्या पाहिजेत, असं उदयनराजे म्हणाले.

शरद पवार यांनी राज्य सरकारला सांगून मराठा आरक्षणावर तोडगा काढणं हे शरद पवार यांचं काम आहे, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

मी पवारसाहेबांना सांगितलं आपल्याकडून काही मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारला दिलं पाहिजे. राज्यातील सरकार पवारसाहेबांमुळे. त्याची बांधणी पवारसाहेबांनीच केली. त्यामुळे पवारसाहेबांनीच मराठा आरक्षणावर मार्ग काढायला हवा, असं उदयनराजे भोसले म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“पुजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे”

प्रेमाच्या आठवड्यात त्यानं मृत्यूला कवटाळलं, प्रेयसीबद्दल लिहिल्या धक्कादायक गोष्टी

“…म्हणून राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला”

अन् भर संसदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या…’निर्मलाताई, माझ्या दादाकडून अर्थखातं शिका’

आता जनताच या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल- आशिष शेलार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या