बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढचे दोन दिवस घराबाहेर पडू नका- उद्धव ठाकरे

मुंबई | निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढचे दोन दिवस घराबाहेर पडू नका, असं आवाहन केलं आहे.

जिथे उद्योग-धंदे सुरु झाले आहेत, त्यांनी उद्या-परवा बंद ठेवावे, वादळ ज्या भागात आहेत, त्या ठिकाणी, किनारपट्टीच्या भागात कोणीही बाहेर पडू नये, मुंबईपासून रायगड सिंधुदुर्गापर्यंत सर्वांनी काळजी घ्यायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

अलिबागला वादळ धडकण्याची शक्यता आहे. पण सिंधुदुर्ग ते पालघरपर्यंत सर्वांना सावध राहण्याची गरज आहे. प्रशासन सज्ज आहे. स्थानिक प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला सहकार्य करा, सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची आवश्यकता असेल, तर त्याची सोय केलेली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढचे 2 दिवस समुद्रात जावू नये म्हणून सूचना नका, तसेच पिण्याच्या पाण्याचा साठा करुन ठेवा, आवश्यक नसलेली विद्युत उपकरणे बंद ठेवा, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना कोरोना!

आनंदाची बातमी… 6 वर्षीय चिमुरडीची आणि 66 वर्षीय वृद्धाची कोरोनावर यशस्वीरित्या मात!

महत्वाच्या बातम्या-

रायगडमधील ‘या’ समुद्र किनाऱ्यावर चक्री वादळाची शक्यता

मनोज तिवारी यांना धक्का; भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी

“नोकऱ्या गेल्या असतील, पगार कपात झाली असेल तर आम्हाला संपर्क साधा”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More