बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीकरणाबाबत मोठी बातमी! ऑनलाईन नोंदणी न करताही 18 ते 44 वयोगटाला मिळणार कोरोना लस; जाणून घ्या कसं

नवी दिल्ली | कोरोनाच्या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. कोरोना लसीसाठी आधी ऑनलाईन नोंदणी करावी लागत होती. मात्र लसीच्या अपुऱ्या डोसमुळे लसीकरणाची मोहीम मंद गतीने चालू होती. लसीकरणाच्या मोहिमेला गदी देण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं मोठा निर्णय घेतल्याची माहिती समजत आहे.

18 ते 44 वयोगटातील लोकांना लसीकरणासासाठी आता ऑनलाईन रजिस्टर गरज नाही. लसीकरणावर गेल्यावर 18 ते 44 मधील लोकांची नोंदणी नोंदणी कोविन अॅपवर केली जाणार आहे. काही राज्यांमध्ये लोक ऑनलाइन स्लॉट बुकिंग केल्यानंतरही लस घेण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या दिवशी गैरहजर राहतात. त्यामुुळे ती लस वाया जाण्याची शक्यता असते.

ग्रामीण भागातही ऑनलाईन नोंदणीबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. या सर्व गोष्टींचा विचार करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला असल्याचं सांगत आहे. ऑनलाईनमुळे प्रक्रियेमुळे राहिलेली लस वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. फोननंबरवरून 4 जणांची अपॉईंटमेंट घेण्याची सुविधा सरकारनं दिली असली, तरी त्यानंतरही ज्या लोकांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोन नाही त्यांना लस घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे.

दरम्यान, 18 ते 44 वयोगटातील लोकांना लसीकरणासासाठी आता ऑनलाईन रजिस्टर गरज नाही. मात्र ही सुविधा फक्त सरकारी केंद्रांवर उपलब्ध आहे. या निर्णयामुळे सर्वाधिक लसीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

रुग्णालयाची खिडकी तोडून अडाणी चोरट्यांनी कोरोना लस समजून नेले ‘हे’ 25 लसींचे डोस

धडकी भरवणारा अपघात! चेकपोस्ट टाळण्यासाठी केलेल्या स्टंटबाजीने एकाचा जागीच मृत्यू, पाहा व्हिडीओ

“सगळा गाढवपणा हा सरकारनं केला आहे अन्…”; विनायक मेटेंचा राज्य सरकारवर घणाघात

दहावी परीक्षेच्या निर्णयाबाबत राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम; लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता

कौतुकास्पद! हॉस्पिटलमधील पगाराची नोकरी सोडून स्मशानात करते असं काम की तुम्हालाही वाटेल अभिमान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More