Top News तंत्रज्ञान

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ट्विटर खाती हॅक; 30 मिनिटात कमावले 50 हजार पेक्षा जास्त डाॅलर्स

नवी दिल्ली | बिटकॉईनच्या हॅकर्सनी अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींची ट्विटर खाती हॅक केली होती. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, अ‌ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस, टेक बिलियनेअर एलोन मस्क, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन यांच्यासारख्या व्यक्तींची ट्विटर अकाऊंटसचा समावेश होता. बिटकॉइन हॅकर्सनी ही ट्विटर खाती हॅक केली होती, असं वृत्त आहे.

हॅकर्सनी काही मिनिटांतच 50, हजार डॉलर्सपेक्षा जास्त पैसे जमा केले. सोर्सेसनुसार या हाय प्रोफाइल खात्यात प्रवेश मिळवण्यासाठी ट्विटर अ‍ॅडमिन खाते प्रथमत: हॅक झाल्याचं समजतंय.

 

 

 

 

ट्विटरवर आमच्यासाठी सर्वांत कठीण दिवस असल्याचं ट्विट सीईओ जॅक डॉर्सी यांनी बुधवारी रात्री उशिरा केलं आहे. आम्ही यासंबंधीची अधिक चौकशी करत आहोत. जशी माहिती येईल तशी आम्ही आपल्यापर्यंत पोहचवू, असं ते म्हणाले आहेत.

ट्विटरवरील पासवर्ड रिसेट करण्याच्या रिक्वेस्टलाही नकार (डिनाय) दिला जात आहे, अशी माहिती देखील कळते आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी केंद्र शासनाला गृहमंत्र्यांचं पत्र

दिलासादायक! सव्वा लाख शेतकरी खुश, बँक खात्यात जमा झाली एवढी रक्कम

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू असताना आरोग्यमंत्री टोपेंनी दिली गुडन्यूज!

समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण; दिसत असेल तर लगेचच हाॅस्पिटल गाठा!

पुण्यात काल दिवसभरात कोरोनाचा कहर, आतापर्यंतचा सर्वांत धक्कादायक आकडा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या