पुणे | शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत घसरण झाल्याने पुणेकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पाणी दोन दिवस पुरेल येवढे साठवून ठेवावे लागणार आहे. पाणी साठवून ठेवावे लागल्याने साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची वाढ होण्याचा धोकाही वाढला आहे.
प्रशासनाने पाणी न साठवण्याचे आदेश नागरिकांना दिले आहेत. तर नागरीकांनी प्रशासनाला मग आम्ही दोन दिवस पाणी पुरवायचे कसे असा उलटा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. जून महिना उलटूनही अद्याप राज्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणीसाठे आटत आहेत. परिणामी आता पाणी कपात अपरिहार्य झाल्याने एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे.
शहराचे दोन समान भाग करुन सम-विषम तारखेला पाणी पुरवठा केला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी पाणी पुरावे यासाठी स्वाभाविकच नागरिक पाणी साठवून ठेवणार आहेत. भांडी आणि बॅरलला (पिंप) व्यवस्थित झाकून ठेवले नाही, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला नाही तर डेंग्यूच्या डासाची पैदास मोठ्या प्रमाणात होईल.
या काळात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने तसेच उघड्या वस्तू, टायर, शहाळे, अडगळीच्या ठिकाणी वस्तूंमध्ये पाणी साचून रहाते. एडिस इजिप्टाय हा डेंंग्यूचा डास असून तो जसा बाहेरील साचलेल्या पाण्यात अंडी घालतो तसाच तो घरातील पाण्यातही अंडी घालतो.
थोडक्यात बातम्या –
‘घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच असे दुटप्पीपणे वागत असतील तर…’, शिवसेनेचा घणाघात
मोठी बातमी! शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेच
शरद पवारांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून गिरीश महाजन अजूनही फेट्याने डोळे पुसतायेत”
Comments are closed.