आम्ही पाठिंबा काढून घेतोय, सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा- एकनाथ शिंदे
मुंबई | शिवसेनेसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तब्बल आठ दिवसांच्या बंडानंतर शिंदेगटाने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला आहे. शिंदे गटाने तसं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलं आहे. आम्ही 39 आमदार ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं असून सरकारला आता बहुमत सिद्ध करायला सांगा, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
पत्रावर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काय निर्णय देतात याच्याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही हालचालींना वेग आल्याचं समजतंय.
शिंदे गटातून न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. एका याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू आहे. यातच शिंदे गटाकडून हे पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. सत्तेसाठी मविआचा अधिकाराचा गैरवापर केला जात आहे. तो थांबवला जावा, असा युक्तीवाद शिंदेगटाकडून करण्यात आला आहे.
राज्यपाल आता उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगणार की कोर्टात या याचिकेवर सुनावणी चालू असल्याने वेट अँन्ड वाॅचची भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या
शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार?; महत्त्वाची बातमी समोर
आम्ही पाठिंबा काढून घेतोय सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा एकनाख शिंदे
शिंदे गटाला मोठा धक्का?, वकिलांनी दिला गंभीर इशारा
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल का?, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
“मी कुठेही गेलो नाही, मला मंत्रीपदाची हाव नाही, शिवसैनिक हेच आमच्यासाठी मोठं पद”
Comments are closed.