बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अरे काय हे!… उद्घाटन होताच अजित पवारांनी डोक्याला हात लावला

अहमदनगर | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कामाबाबत अतिशय चाणाक्ष अशी ओळख आहे. अजित पवार यांच्या कार्यक्रमात काही चुक झाल्यास तिथल्या तिथं सुनावलं जातं. त्यातच आता अजित पवार यांना उद्घाटनाला बोलावले असता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यानावात चुक झाल्यामुळे अजित पवारांनी चक्क डोक्याला हात लावला.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या पिंपळनेर येथे संतश्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंगगाथेच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडला. तसेच निळोबाराय यांचं निवासस्थान असलेला वाडा आणि मंदीर यांचा जीर्णोधार होणार असल्याने भूमिपुजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उद्घाटनाच्या कोनशिलेवनर हसन मुश्रीफ यांच्या नावात चुक झाली होती. हसन मुश्रीफ यांचे नाव ‘हसन मुस्त्रीफ’ असे लिहिलेलं होतं. ते पाहून अजित पवारांनी कपाळालाचं हात लावला. त्यात कोनशिलेवर हसन मुश्रीफ यांचे नाव ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसत आहे. हसन मुश्रीफ यांच्या नावात झालेली चुक आयोजकांच्या लक्षात आणून दिली. तसेच अशा चुका टाळण्याचा सल्ला अजित पवारांनी दिला.

दरम्यान, या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अजित पवार उपस्थित होते. अजित पवारांनी हसन मुश्रीफ यांच्या नावात चुक झाल्यामुळे त्यांच्या खास शैलीत आयोजकांना सुनावलं आहे. ही चुक लक्षात आणून देत असताना दिलीप वळसे पाटील गालातल्या गालात हसत होते. त्यामुळे पुन्हा एकदा तिथल्या तिथे कान टोचण्याचा अजित दादांची शैली पुन्हा एकदा समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“भरतासारख्या भावावर फक्त रामच प्रेम करू शकतात, आपण ते करू शकत नाही”

पार्थ पवार पुन्हा मावळातून निवडणूक लढवणार का?; ट्विटमुळे चर्चांना उधाण

अखेर काँग्रेसच्या प्रयत्नांना यश, भाजपने निवडणुकीत दिला काँग्रेसला हात

वानखेडे-मलिक वादात आता नवाब मलिकांच्या दोन्ही मुलींची उडी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More