महाराष्ट्र मुंबई

फेसबूक पोस्ट करत महिलेचा अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली…

मुंबई | अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून चहावर एक कविता शेअर केली मात्र, टिशा अग्रवाल नावाच्या एका महिलेचा असा दावा आहे की अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली कविता तिने लिहिलेली आहे.

या महिलेने अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट केली आहे. ही कविता आपली असून अमिताभ बच्चन यांनी शेअर करताना त्याचं क्रेडिट दिले नाही, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सर, तुमच्या वॉलवर माझी कविता येणं हे माझं भाग्यच आहे, परंतू तुम्ही या कवितेला माझं नाव दिलं असतं तर मला खूप आनंद झाला असता, मला आशा आहे की, तुम्ही यावर उत्तर नक्की द्याल, असं  या महिलेने म्हटलंय.

दरम्यान, एका ट्रोलर्सने अमिताभ बच्चन यांना आठवण करून दिली की, जेव्हा कुमार विश्वास यांनी त्यांच्या कवितांमध्ये हरिवंश राय बच्चन यांच्या काही ओळी वापरल्या तेव्हा तुम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. आणि तुम्हीच जर टिशाचे श्रेय तिला देत नाहीत हे काय आहे? त्याचप्रमाणे अनेक जणांनी अमिताभ बच्चन यांना टिशाला तिच्या कवितेचे श्रेय द्यावं अशी विनंती केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मी परत जाईन, परत जाईन म्हणायला त्यांना कोणी बोलावलंही नव्हतं- अजित पवार

धक्कादायक! ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू

देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, विरोधकांनी एकत्र यायला हवं- संजय राऊत

धक्कादायक! राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यानेच केले एकनाथ खडसेंवर अत्यंत गंभीर आरोप

रूपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या