बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् काँग्रेसच्या माजी आमदारानं एका बुक्कीत फिरता फॅन रोखला; पाहा व्हिडीओ

बुलडाणा | बुलडाण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि चिखली मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा एक पराक्रम सध्या सर्वत्र चर्चेत आहे. त्यांच्या या पराक्रमाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल बोंद्रे एका मंजावर बसलेले दिसत आहे.

काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात राहुल बोंद्रे कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी स्टेजवर उभे राहिले होते. त्यावेळी वरील फिरता पंखा त्यांच्या काहीसा डोक्याच्या वरच होता. कार्यकर्त्यांनी त्यांना पंख्यापासून सावधगिरी बाळगण्यास सांगितलं. मात्र कार्यकर्त्यांसमोरच राहुल बोंद्रे यांनी त्यावेळी विक्रमच गाजवला.

पंख्यापासून सावध राहण्याऐवजी राहुल बोंद्रे यांनी पंख्याला थेट बुक्की मारली. राहुल यांच्या बुक्कीने फिरता पंखा जागेवरच थांबला. यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून राहुल यांचं देखील मनोबल वाढवलं. चिखली तालुक्यातील युवक काँग्रेसच्या मेळाव्यातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, अशी हिरोगिरी करताना त्यांना दुखापत देखील होण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने असं काही घडलं नसून असा स्टंट करण्यापासून सावधगिरी बाळगावी. राहुल यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. तसेच हा व्हिडीओ अनेक लोकांनी शेअर देखील केला आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

‘8 पदरी रस्ता, 6 पदरी पुल अन् वर मेट्रो’; नितीन गडकरींचं पुण्यासाठी मोठं स्वप्न!

‘युपी निवडणुकीआधी बड्या हिंदू नेत्याची….’; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त वक्तव्य

“थोडं थांबा… दिवाळीनंतर आपलंच सरकार येणार”

अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; ‘हे’ प्रमाणपत्र नसेल तरीही मिळणार प्रवेश

माझ्या तोंडी वक्तव्य घालून समाजात द्वेष पसरवला जातोय – अण्णा हजारे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More