ऐतिहासिक विजयानंतर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
लखनऊ | उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल काल हाती आले. पाच पैकी चार राज्यात भाजपने मुसंडी मारली. तर उत्तर प्रदेशातील भाजपचा विजय ऐतिहासिक ठरला. ऐतिहासिक विजयानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) कडाडले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narrendra Modi) नेतृत्वाखाली भाजपला चार राज्यात जनादेश मिळाला असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले. कोरोनाकाळात आपण अखंडपणे काम केलं. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण जिंकलो. हा विजय प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांचा आहे, असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
उत्तर प्रदेशातील विजयानंतर योगी आदित्यनाथ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. ज्यावेळी आपण कोरोना, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत होतो, त्यावेळी ही लोक आपल्याविरोधात षडयंत्र रचत होती. पण जनतेने मतदानातून यांना धडा शिकवला, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचा विजय ऐतिहासिक ठरला आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणुन निवडून येणारे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
थोडक्यात बातम्या-
पाच राज्यातील निकालानंतर भाजपची मोठी घोषणा! आता मुंबई…
2022 मधील निकालांनी 2024 मधील भविष्य निश्चित केलंय – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पाच राज्यातील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
“जावेद भाई अपना हार्मोनियम पॅक कर लो, सलीम भाई को गाना सुनना है”
चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला गंभीर इशारा, म्हणाले ’11 तारखेला…’
Comments are closed.