बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ सुट्या, केंद्र सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून कामगार कायद्यामध्ये सुधारणा करणार असल्याची चर्चा  होती. त्यातच आता मोदी सरकार कामगार कायद्यामधील सुधारणा अर्थात नवीन लेबर कोड लागू करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत.

नविन कामगार कायदा लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक अर्जित रजांची संख्या 300 पर्यंत जाईल. यापूर्वी अर्जित रजा 240 इतक्या होत्या. केंद्र सरकारकडून लेबर कायदा लागू केल्यास अर्जित रजांची संख्या 300 इतकी होणार आहे. सदर कामगार कायद्यामधील नियमांमध्ये बदल करण्याकरिता चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

कामगार मंत्रालय, कामगार संघटना आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये दिवसातील कामाचे तास, पेन्शन, वर्षातील सुट्या, पीएफ या गोष्टींवर चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेमध्ये अर्जित रजांची संख्या 240 वरून 300 पर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. काही राज्यांची पुर्वतयारी न झाल्याने कामगार कायदा लागू होण्यास उशीर झाल्याची माहिती देखील आहे.

दरम्यान, केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी याबाबत माहिती दिली आहे. नवीन कामगार लागू करण्यापूर्वी केंद्र सरकार प्रत्येक राज्याला सोबत घेण्याचा विचार करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही राज्यांसोबत चर्चा करत आहोत. या नवीन कायद्यासाठी अनेक राज्यांची सहमती असून ते नवीन मसुदा नियम बनवत आहेत. नवीन कामगार कायदा कधी येईल, हे सांगता येणं कठीण आहे. मात्र, 2022 पर्यंत चार कामगार कायदे लागू होतील, अशी अपेक्षा असल्याचं रामेश्वर तेली यांनी बोलून दाखवलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार महाविकास आघाडीवर नागासारखे बसलेत”

“मलिकांविरोधात ईडीजवळ पुरावे, दाऊदच्या माणसाचा राजीनामा घेतलाच पाहिजे”

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात

“आज माझा विधिमंडळात होता फेर फटका, कारण मला द्यायचा आहे महाविकास आघाडीला झटका”

“शरद पवारांनी वर्षानुवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More