बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून ‘या’ चार नावांची देशाच्या राजकारणात चर्चा!

नवी दिल्ली | केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने एका पाठोपाठ एक राज्य काबिज केली. पण आता महागाई, बेरोजगारी आणि अन्य काही कारणांमुळे विरोधक एकवटताना दिसत आहेत. यामुळे मोदींना पर्याय कोण? अशी चर्चा सुरूये. अशाच मोदींना पर्याय म्हणून सध्या चार नावे वेगाने पुढे येत आहेत.

बिहारमध्ये नितीश यांनी भाजपला बाहेरचा रस्ता दाखवला आहे व पुन्हा आपल्या जुन्या मित्राशी अर्थात लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केलीये. यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपला जबर फटका बसू शकतो.

भाजपसमोर दुसरे मोठे आव्हान आहे ते प. बंगालमधील तृणमूल काँग्रेसचं. तमिळनाडूत द्रमुकचे एम. के. स्टॅलीन यांनी मुख्यमंत्री म्हणून आपला प्रभाव निर्माण केला आहे. तसेच महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं जातंय.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार जरी पायउतार झाले असले आणि सध्या मोठी फुट पडल्यामुळे शिवसेनेची अवस्था बिकट झालीये. मात्र महाविकास आघाडीतील तिनही पक्ष एकत्र राहीले तर त्यांची मतांची टक्केवारी भाजपपेक्षा बरीच जास्त असेल.

थोडक्यात बातम्या- 

“काहींना वाटतं की शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू आहे, जी कोणीही उचलून…”

महाराष्ट्रातील सर्व आमदारांसाठी गुड न्यूज; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

“ज्यांच्यावर आधी आरोप झालेत त्यांना आता क्लिनचीट मिळेल”

शिंदे सरकारच्या स्थापनेबाबत पंकजा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More