बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

मुंबई | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री (Higher Education Minister) उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीला अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना उदय सामंत यांच्या सुरक्षा घेऱ्यातील एका गाडीचे टायर पंक्चर झाल्यानं ती गाडी उदय सामंत बसलेल्या गाडीवर येऊन आदळली. परिणामी हा अपघात घडला आहे.

गाडीमध्ये उदय सामंत एकटेच होते. त्यांना कसलीही दुखापत झाली नसून काळजी करण्यासारखं कारण नाही, अशी माहिती सध्या प्राप्त होत आहे. त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याला मात्र दुखापत झाली आहे. त्या अधिकाऱ्यावर कुपर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

सदरील अपघात हा 8 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. त्यांच्या ताफ्यातील एका गाडीनं दुसऱ्या गाडीला धडक दिल्याची घटना घडली आहे. जखमी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या दवाखान्याचा खर्च मंत्री उदय सामंत स्वत: करणार आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री म्हणून उदय सामंत यांना ओळखण्यात येत. कोकणातील शिवसेनेचा हुकमी एक्का ही उदय सामंत यांची खास ओळख आहे.

थोडक्यात बातम्या 

Gold Rate: लग्नसराईत स्वस्त सोने खरेदीची संधी, जाणून घ्या नवे दर

राष्ट्रपतींच्या सहीसह कृषी कायदे रद्द, पण शेतकरी ‘या’ मागणीवर ठाम

“भाजप हा पक्ष जाता-जाता सर्वकाही विकून जाईल”

पेच नव्या संघनायकाचा! कोहलीनंतर ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर RCBची धुरा?

पुण्यात दिवसभर संततधार पाऊस; राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More