Top News राजकारण सोलापूर

‘या’ आरोपावरून भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर | भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुरातील बार्शी शहर पोलीस स्थानकात अदखालपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी तक्रार दिली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या निमित्त केलेल्या भाषणांनंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. दरम्यान निर्बुद्ध शिवराळ बरळणं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं, अशी टीका भाजपचे नेते नारायण राणे यांनी केली होती. याच विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रारी अर्ज देण्यात आला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना पुळचट, निर्बुद्ध अशा शिवीगाळीची त्याचप्रमाणे दमदाटीची भाषा वापरुन शिवसैनिकांचा अपमान केल्याचा आरोप बार्शीतील भाऊसाहेब आंधळकर यांनी केलाय.

वैयक्तिक पातळीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणं शिवसैनिकांना खपणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी भाषेत टीका करणं हे निंदनीय आहे. याच कारणाने आम्ही पोलिसांत गुन्हा दाखल केलाय, असं आंधळकर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जान कुमार सानू तुला गर्व असायला हवा….’; जान कुमार सानूच्या समर्थनात धावली ‘ही’ अभिनेत्री

“उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा देणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते”

दिवाळीनंतर शाळा, कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार- वर्षा गायकवाड

केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचा 31 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी सत्याग्रह

हम तो डुबे है सनम, तुमको भी ले डूबेंगे! अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईची कोलकातावर मात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या