बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिमानास्पद! ग्लोबल टीचर डिसले गुरुजींच्या नावाने परदेशात शिष्यवृत्ती सुरू

यवतमाळ | महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले रणजितसिंह डिसले यांनी गेल्यावर्षी सप्टेंबर 2020 मध्ये ग्लोबल टीचर ॲवार्ड जिंकला होता. त्यांना या पुरस्कारामध्ये 7 कोटींची रक्कम मिळाली होती. हा पुरस्कार जिंकल्यावर त्यांनी पुरस्काराची एवढी मोठी रक्कम शिक्षण प्रसारासाठीच वापरण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता आणखी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. डिसले गुरुजींच्या नावाने परदेशात शिष्यवृत्ती सुरू केली गेली आहे.

शिक्षण प्रसाराविषयी रणजितसिंह डिसले यांची तळमळता लक्षात घेऊन इटली सरकारने त्यांच्या नावे आपल्या देशातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आता इटलीतील सॅमनिटे सरकार मझोने यांना मिळालेल्या रकमेतून इटलीतील गुणवंत विद्यार्थ्यांना 400 युरोची म्हणजेच 36 हजार रुपयांची स्कॉलरशीप देण्यात येणार आहे. सॅमनिटे राज्यातील विद्यापीठ स्तरावर दहा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. 10 वर्षात 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.

रणजितसिंह डिसले यांनी त्याआधी अर्धी रक्कम म्हणजे साडेतीन कोटी अंतिम फेरीतील अन्य नऊ शिक्षकांना देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार अंतिम फेरीतील इटली येथील शिक्षक कार्लो मझोने यांनाही रक्कम देण्यात आली. त्यातूनच ही स्कॉलरशीप देण्यात येणार आहे.

जगभरातील गरजू मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून या शिष्यवृत्तीकडे पाहता येईल. इटलीतील ही मुले भारतीय शिक्षण व्यवस्थेत देखील आपले योगदान देतील, असा विश्वास वाटतो. भविष्यात या मुलांना भारतीय संस्कृती, भाषा यांचे शिक्षण देऊन परदेशात देखील भारतीय संस्कृतीचा प्रसार केला जाईल, असं रणजितसिंह डिसले यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

चेन्नईच्या विजयानंतर जडेजाचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ला अनिल परबांनी दाखवला हिरवा झेंडा

“देवेंद्र फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?”

…म्हणून उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार!

चेन्नईचा राजस्थानवर सुपर विजय, गुणतालिकेत घेतली भरारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More