बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिक्सर किंग फक्त युवराज सिंगच; एका षटकात ठोकले 4 गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ

रायपूर | रायपूरच्या शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियम वर रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज चालू आहे. या मध्ये इंडिया लिजेंड आणि वेस्ट इंडिज लिजेंड यांच्या उपांत्य सामना खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात इंडिया लिजेंडने वेस्ट इंडिज लिजेंडवर 12 धावांनी विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग.

इंडिया लिजेंड आणि वेस्ट इंडिज लिजेंड यांच्यात झालेल्या सामन्यात युवराज सिंगनं आक्रमक फलंदाजी करत फक्त 20 चेंडूत 49 धावा केल्या. यावेळी त्याने 6 गगनचुंबी षटकार लावले. तर वेस्ट इंडिज लिजेंडच्या नागमुट्टूने टाकलेल्या 18 व्या ओव्हरमध्ये युवराजने 4 षटकार ठोकत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं होतं.

संपूर्ण सामन्यात युवराजने 245 च्या स्ट्राईक रेटने 49 धावा केल्या. या डावात त्याने 6 षटकार आणि 1 चौकार लावला. युवराजच्या या आक्रमक खेळीमुळे भारताला 218 एवढी धावसंख्या उभारता आली. त्याचबरोबर त्याने या सामन्यात अफलातून क्षेत्ररक्षण देखील केलं होतं. त्याचबरोबर या सामन्याच्या विजयसोबत भारत आता सिरीजच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

दरम्यान, श्रीलंका लिजेंड विरुद्धच्या सामन्यात देखील युवराजने 4 चेंडूत 4 षटकार मारले होते. सचिन तेंडुलकर आणि युवराजच्या मागील काही चांगल्या खेळीमुळे फायनलमध्ये खेळण्यासाठी इंडिया लिजेंडचा संघ आणखी मजबूत झाला आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

थोडक्यात बातम्या-

अंबानींच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात आता मनसेची उडी; बड्या मंत्र्यावर धक्कादायक आरोप

शरद पवारांची मोठी खेळी, काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता

करुणा शर्मा आता राजकारणाच्या आखाड्यात, केली ‘ही’ मोठी घोषणा

संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा- चंद्रकांत पाटील

मुंबईचे नवे आयुक्त हेमंत नगराळे कोण आहेत?; आतापर्यंत केलीय ‘ही’ जबरदस्त कामगिरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More