बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युक्रेनमधून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; शेकडो सैनिकांची रशियापुढे शरणागती

किव | युक्रेनमधून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलीये. युक्रेनच्या आणखी शेकडो सैनिकांनी रशियाच्या लष्करापुढे शरणागती पत्करली असून अशा सैनिकांची संख्या आता 1730 झाली आहे.

अझोवत्साल स्टील प्रकल्पाच्या आडोशाने युक्रेनचे सैनिक रशियाच्या लष्कराशी झुंज देत होते. मात्र त्यांना प्रतिकार थांबविण्याचे आदेश त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर तेथील युक्रेनच्या सैनिकांपैकी अनेकजण रशियाला शरण आले.

युक्रेनच्या सैनिकांचा हा शेवटचा बालेकिल्ला नष्ट केल्याशिवाय त्या शहरावर रशियाला संपूर्ण ताबा मिळविणे शक्य नाही.

युद्धकैदी बनलेल्या युक्रेन सैनिकांच्या नावांची नोंदणी रेड क्राॅस संस्थेने मंगळवारपासून सुरू केली. या दोन देशांमध्ये झालेल्या करारानुसार रेड क्राॅस हे काम करत आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! संभाजीराजेंसाठी शिवसेना खेळी करण्याची शक्यता!

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट समोर!

मोठी बातमी! काँग्रेसला जोर का झटका; 50 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या नेत्याचा भाजपत प्रवेश

“महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More