पुणे महाराष्ट्र

ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गा विरोधातील- मोहन आगाशे

पुणे | आपण सतत निसर्गाच्या विरोधात जात आहोत. आपण त्याचाच एक भाग आहोत हे विसरलो आहोत. त्यामुळे ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गविरोधातील आहे, असं ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी म्हटलं आहे.

सद्यस्थितीत कोरोनाला कसं हरवायचं नि मनुष्याच्या शरीरातून या विषाणूला कसं नष्ट करायचं यामागे मनुष्यजात लागली आहे. रात्रंदिवस कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वॉरियर्स जीवाचे रान करीत आहेत. पण ही लढाई आत्ताची नाही, असं मोहन आगाशे म्हणाले आहेत.

वर्तमान जगताना भूत आणि भविष्याचा संदर्भ असावा लागतो. जसं एखाद्या चित्राला पार्श्वभूमी असल्याशिवाय ते उठून दिसत नाही. तशीच माणसाच्या आयुष्याला पार्श्वभूमी लागते. जे काही घडले आणि घडणार आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण आणि निसर्ग वेगळे नाही. आपण एकच आहोत. पण निसर्ग आपल्यापेक्षा मोठा आहे, असंही आगाशे यांनी सांगितलं आहे.

प्रगतीच्या नावाखाली माणूस म्हणून एक वेगळंच रूप धारण केलं आहे. आपण निसर्गाच्या विरोधात जात आहोत. आपण आपल्या हाताने निसर्गाचे संतुलन बिघडवलं आहे. त्यामुळे आज मानवजातच त्याला बळी पडते आहे, असं मोहन आगाशे म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी किम जोंग उन लांब राहतायत”

अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली; आयसीयूमध्ये उपचार सुरु

मेहूल चोकसी, रामदेव बाबांसह अनेक कर्जबुडव्यांचं 68 हजार कोटी कर्ज माफ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या