Top News पुणे महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंनी उडवली नारायण राणेंची खिल्ली; म्हणाल्या…

पुणे | राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली नसती तर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील हे भाजपमध्ये असते असा दावा भाजप नेते नारायण राणेंनी केला होता. मात्र या दाव्यावर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राणेंची खिल्ली उडवली आहे.

राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. राणे नेमकं कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला. बारामतीच्या मतदान केंद्रावर मतदानावेळी आल्या तेव्हा सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलत होत्या.

महाराष्ट्रातील राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. मी स्वत: चार-पाच जयंत पाटलांना ओळखते. ते राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांविषयी बोलले असतील असं वाटत नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल असं म्हणत जयंत पाटलांनी नारायण राणेंना आव्हान केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“चुरस आहे पण विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू, पुणे तर वनवेच”

लव्ह जिहाद व जबरदस्तीने धर्मांतर कायद्याबाबत पुनर्विचार करा- मायावती

“मला सत्ता हा विषय गौण असून भाजपच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली हे जाहीर कराच”

“कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही”

लहानपणी माझंही लैंगिक शोषण झालं; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या