बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ शहरात म्यूकरमायकोसिसचा कहर सुरूच; आतापर्यंत तब्बल 100 जणांचा मृत्यू

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये म्यूकरमायकोसिसचा कहर सुरूच असल्याचं भयावह चित्र पाहायला मिळत आहे. म्यूकरमायकोसिसमुळे औरंगाबादमध्ये आतापर्यंत तब्बल 100 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आतापर्यंत 910 म्यूकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, औरंगाबादमध्ये म्यूकरमायकोसिसचा मोठ्या प्रमाणात विस्फोट झाल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात म्यूकरमायकोसिसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात 15 नव्या म्यूकरमायकोसिस बाधितांची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्याही चिंतेत आणखी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये म्यूकरमायकोसिसचे रुग्ण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच कोरोनानंतर आता या नव्या रोगाने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

म्यूकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून यावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन काही जिल्ह्यांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याचं चित्रही पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये अँफोटेरीसिन-बी या इंजेक्‍शनचा पुरवठा न झाल्याने दिवसभरात नागरिकांना एकही इंजेक्शन मिळालं नव्हतं. परिणामी रुग्णांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात इंजेक्शन मिळवण्यासाठी धावपळ होत असल्याचंही दिसून आलं.

थोडक्यात बातम्या –

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून एका दिवसात तब्बल एवढ्या लाखांचा दंड वसूल

“मी सुपारीचोर आहे तर, निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती”

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर वाढला

जगभरात 1 तास इंटरनेट सेवा बंद; नेटकऱ्यांची तारंबळ

लसीकरणासाठी केंद्र सरकारची नवी नियमावली; लस वाया घालवणाऱ्या राज्यांना दणका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More