मंत्रालयाबाहेर विद्यार्थ्याचा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न

मुंबई | शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच आता एका विद्यार्थ्याने मंत्रालयाबाहेर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अविनाश शेटे असं या 25 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. 

मूळच्या अहमदनगरच्या असलेल्या अविनाशनं राज्य सरकारची कृषी अधिकारी पदाची परीक्षा दिली होती. मात्र सरकारने या जागेबाबत काहीच निर्णय घेतला नाही. अविनाशने मंत्रालयात खेटे मारले.

दरम्यान, कोणीच दखल घेत नसल्याने त्याने मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं. पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला वेळीच ताब्यात घेतलं, त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय. मात्र मंत्रालयात होत असलेल्या मनमानीचा प्रश्न पुन्हा समोर आलाय.