बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसोबत फोटो; ‘या’ कारणामुळे पोलिसांनी केली अटक

नाशिक | आमदार असल्याचं भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या तोतया आमदाराला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. राहुल आहेर असं पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदवड गावाजवळ त्याला अटक करण्यात आली. काही अत्यंत धक्कादायक गोष्टी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

राहुल आहेरला पोलिसांनी अटक केली तेव्हा सिव्हर रंगाच्या इनोव्हा गाडीत होता. या गाडीवर आमदार लावतात ते हिरव्या रंगाचे सत्यमेव जयते लिहिलेलं स्टीकर लावण्यात आलं होतं. आमदार वगळता इतरांनी हे स्टीकर वापरणं मोठा गुन्हा आहे. पोलिसांनी राहुलला ताब्यात घेऊन अधिक तपासणी केली असता आणखी काही धक्कादायक बाबी समोर आल्या.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नावाचे आणि सही असलेले कोरे लेटरहेड पोलिसांना गाडीत आढळले, तसेच अधिवेशन काळात विधानभवन परिसरात गाडीच्या प्रवेशासाठी दिले जाणारे पासही आढळले, याशिवाय माजी आमदार अनिल कदम यांच्या विधानसभा सदस्यत्वाचे ओळखपत्रही राहुलकडे मिळून आले.

महागड्या गाड्यांसोबत फोटो, महागडी लाईफस्टाईल दाखवायची तसेच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसोबत फोटो काढून त्यांच्या जवळचे भासवायचे, तुमची कामं करतो सांगून पैसे घ्यायचे आणि लोकांची फसवणूक करायची अशी राहुलची पद्धत असल्याचं समोर आलं आहे. विनाअनुदानित शाळा अनुदानित करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्यायालयाने त्याला ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते तसेच मंत्र्यांशी जवळीक असल्याचं दाखवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केलाय. यामध्ये राहुलसोबत अन्य कोण सहभागी होते का?, हे मोठे रॅकेट वगैरे नाही ना?, यासंदर्भात तपास केला जात आहे. या प्रकरणी आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी एका शहिदाचा मुलगा आहे, मी शहिदाचा अपमान कोणत्याही किमतीमध्ये सहन करणार नाही”

भारताची तालिबानसोबत महत्वाची बैठक, नेमकं काय घडलंय जाणून घ्या!

गाड्यांचे क्रमांक बदलण्याच्या निर्णनंतर आता हॉर्नबाबत नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी आधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

पुणेकरांनो चिंता वाढली! कोरोना रूग्णांच्या आजच्या आकडेवारीत वाढ, वाचा आकडेवारी

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More