नेत्यांचा मुलगा की सामान्य कार्यकर्त्याकडे; राष्ट्रवादीचं युवक प्रदेशाध्यपद कुणाकडे?

मुंबई | युवक प्रदेशाध्यपदाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाल्याचं चित्र आहे. नेत्यांच्या मुलाला नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या, असा सूर पहायला मिळतोय. 

संग्राम कोते-पाटील यांनी युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीपुढे नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याचं आव्हान आहे. 

युवक प्रदेशाध्यपदासाठी सध्या राष्ट्रवादीतील प्रस्थापित नेत्यांच्या मुलांची नावं आघाडीवर आहेत. त्यामध्ये माजी आमदार राजन पाटील यांचा मुलगा अजिंक्यराणा पाटील, भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव यांची नावं चर्चेत आहेत. 

दुसरीकडे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सूरज चव्हाण, रविकांत वर्पे, मेहबूब शेख यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी हे पद नेत्यांच्या मुलाकडे सोपवणार की सामान्य कार्यकर्त्यांकडे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

महत्वाच्या बातम्या-

-यांच्याशिवाय ‘बेस्ट कपल’ कुठलं? ‘व्हॅलेंटाईन डे’ दिनी धनंजय मुंडेंचा सेना-भाजपवर प्रहार

मुख्यमंत्र्यांमुळे मराठा समाजाला न्याय, शिवसेना आमदाराची फडणवीसांवर स्तुतीसुमनं

राष्ट्रवादीसोबत ‘मनसे’ नातं जुळणार का?, एकीकडे राष्ट्रवादीची तर दुसरीकडे मनसेची बैठक!

नको नको म्हणता म्हणता शिवसेना युतीच्या जाळ्यात; हा असणार फॉर्म्युला?

-महाआघाडीचे पंतप्रधान कोण असतील? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली ‘ही’ नावं…

Google+ Linkedin