मुंबई | मुकेश अंबानींच्या घराजवळ मिळालेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. एनआयएकडून सचिन वाझे यांच्या सुरु असलेल्या चौकशीत स्पोर्टस बाईकची एन्ट्री झाली आहे.
दमणमधून ही बाईक एनआयएनं जप्त केली आहे. माहितीनुसार ही स्पोर्टस बाईक बेनेली कंपनीची आहे. मीना जॉर्ज या महिलेच्या नावावर ही गाडी आहे. जवळपास 7 लाख किंमतीची ही बाईक असून एनआयएने मीना जॉर्ज यांना ताब्यात घेतले होतं. ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मीना जॉर्ज सचिन वाझे यांच्यासोबत दिसून आल्याचं सांगितलं जात आहे. त्यावेळी त्यांच्या हातात पैसे मोजण्याचं मशीन होतं, असंही सांगितलं जात आहे.
एनआयएच्या कार्यालयात टेम्पोमधून ही बाईक आणण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 कार आणि एक बाईक जप्त करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकांनी आतापर्यंत एकूण 9 वाहनं जप्त केली आहेत. या वाहनांचा उपयोग वाझे किंवा वाझेंच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा एनआयएचा संशय आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सचिन वाझे यांनी आपण सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर आणि कॉम्प्युटर मिठी नदीत टाकल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे यांना घटनास्थळी नेऊन या सर्व गोष्टी मिठी नदीतून मेटल डिटेक्टरच्या साहाय्यानं शोधून काढल्या होत्या. आता या सर्व गोष्टींची तपासणी सुरु आहे. तर, मुकेश अंबानींच्या घराजवळ मिळालेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएच्या हाती आणखी एक महागडी गाडी लागली आहे. सचिन वाझे वापरत असलेल्या ऑडी कारचा तपास देखील गेल्या काही दिवसांपासून सुरु होता.
थोडक्यात बातम्या –
पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा
जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी
मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
धक्कादायक! मित्रानेच केली मित्राची हत्या; कारण ऐकूण तुम्हीही व्हाल हैराण
धार्मिक नियमांचं पालन करत चेन्नईतील ‘या’ खेळाडूने मागितली वेगळी जर्सी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.