Top News पुणे मुंबई

पुढच्या 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामान खात्याकडून इशारा, ‘या’ भागात होणार मुसळधार पाऊस

पुणे | राज्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळतोय. अशात आता 15 ऑगस्टला म्हणजेच शनिवारी विकेंडला राज्यात आसमानी संकट असणार आहे. येत्या पाच दिवसात कोकण, गोवा त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आलाय.

पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांच्या सांगण्यानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार आहे. एक्सप्रेस हायवेवरही मुसळधार पावसाने दरडही कोसळू शकतात.

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात जास्त पाऊस पडला नाही मात्र ऑगस्टमध्ये पाऊस चांगलाच कोसळला आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्रात 5 जिल्हे सोडून सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.

यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने चांगलीच सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात ऑगस्टमधील मोठ्या पुराचा धोकाही काही प्रमाणात टळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत आत्महत्या प्रकरणात मनसेचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा

जगातील प्रसिद्ध अभिनेत्यांना बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने टाकले मागे…

सुशांत सिंग राजपूतच्या डायरीतले ‘हे’ सत्य अखेर आले समोर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.