बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोहली’ने केला होता तब्बल 2 लाखांचा दारूसाठा, पोलिसांनी धाड टाकल्यावर पितळ पडलं उघडं!

नागपुरात | कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कारणामुळे लाॅकडाऊन होईल आणि आपल्याला अवैध दारू विक्री करून यातून मोठा पैसा कामविता येईल, या उद्देशाने तीन तरूणांनी तब्बल सव्वा दोन लाखांची विदेशी दारूचा साठा जमा करून ठेवला होता. मात्र पोलिसांनी धाड टाकल्यावर त्यांचं पितळ उघडं पडलं आहे.

नागपूर गुन्हे शाखा पोलिसांना त्यांच्या खबरीने या प्रकरणाची माहिती दिली होती. या माहितीनुसार इमानवाडा पोलीस स्टेशन भागातील चंदन नगर येथे संजय कोहली या व्यक्तीने अजून तीन जणांसोबत एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा साठा तळघरात साठवून ठेवला होता. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी या तिघांना अटक करुन मोठ्या प्रमाणात दारु जप्त केली आहे.

गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुसाठा बघून सर्वच आश्चर्यचकित झाले होते. पोलिसांना त्यांच्या तळघरात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ब्रँडच्या विदेशी दारुचा साठा आढळून आला. यामध्ये 16 पेटी विस्की, 35 पेटी देशी दारु, 15 पेटी बिअर अशा तब्बल 66 पेटी दारु जप्त करण्यात आली. या दारुची एकूण किंमत 2 लाख 25 हजारच्या जवळपास असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

एखाद्या व्यक्तीने त्याच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुचा साठा अवैध पद्धतीने विक्री करण्यासाठी लपवून ठेवला असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे एक्साईज खात्याची याकडे नजर नव्हती का?, असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या

धोनीच्या चेन्नईला मोठा झटका, हा निर्णय बसणार चेेन्नईच्या जिव्हारी?

धक्कादायक! सातवीतल्या मुलीने गळफास घेत संपवलं आपलं जीवन

डुकराचा बड्डे! या चिमुकलीची कल्पनाशक्ती पाहून सोशल मीडियावर सारेच हैराण, पाहा व्हिडीओ

बाप की सैतान?, ब्लेडने गळा कापून पित्याने केली आपल्या चिमुकलीची हत्या

“माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More