Top News भंडारा महाराष्ट्र

भंडारा आग प्रकरण; त्यानं जीवाची बाजी लावली नसती तर आणखी मोठा अनर्थ…

भंडारा | तीन दिवसांपुर्वी भंडारामध्ये घडलेली घटना कोणाही विसरू शकत नाही. भंडाऱ्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 निष्पाप नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला होता तर 7 बालकांना वाचवण्यात यश आलं होतं.

सात बालकांना वाचवताना रूग्णालयातील परिचारक अजित कुर्जेकर यांनी आपल्या जीवाची बाजी लावत सात बालकांना वाचवलं. कुर्जेकरांनी दाखववेल्या या धाडसाने सात जीव वाचले अन्यथा आणखी मोठा अनर्थ घडला असता. सोशल माध्यमांंवर त्यांचं कौतुक होत आहे.

9 जानेवारीला रात्री लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं दिसलं. त्यानंतर नर्सने दरवाजा खोलला असता मोठ्या प्रमाणात धुर दिसला. नंतर तातडीने रूग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याबाबत माहिती देण्यात आली. रूग्णालयाती कर्मचाऱ्यांनी बाळांना बाहेर काढलं. यामध्ये कुर्जेकरांचाही समावेश होता.

दरम्यान, या घटनेतील पीडित कुटुंबियांना आरोग्यमंत्री यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर केंद्र सरकारने  2 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

…अन् इंदोरीकर महाराज ढसाढसा रडले; पाहा व्हिडीओ

मराठी नंबर प्लेटवर कारवाई ही मातृभाषेची गळचेपी- राजू पाटील

अकरावी, आयटीआय आणि इतर प्रवेश प्रक्रियांचा मार्ग आता झाला मोकळा!

‘तो’ निर्णय माझा व्यक्तिगत नव्हता, सरकारचा होता- नितीन राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या