नांदेड महाराष्ट्र

राज्यातील जनतेने वीज बिल भरु नये- प्रकाश आंबेडकर

नांदेड | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील वीज ग्राहकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय झाला होता, तो कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला, याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे.

लॉकडाऊन काळातील वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलं. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल भरु नये, असं आवाहन केलं आहे. बिलं भरली नाहीत तर पन्नास टक्के सवलत मिळेल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“ऊर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात”

मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार- देवेंद्र फडणवीस

गुपकर आघाडीत काँग्रेसही सहभागी, देशासमोर काँग्रेसला उघडं पाडू- देवेंद्र फडणवीस

वीजबिल माफ करा, अन्यथा रस्त्यावर उतरु- रक्षा खडसे

वीज बिलात सूट द्या अन्यथा… तृप्ती देसाईंचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या