Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात आजही नव्या कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ, दुसरीकडे डिस्चार्जची संख्याही मोठी

पुणे |  पुण्यात गेल्या आठ दहा दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांमध्ये चांगलीच वाढ झाल्याचं चित्र आहे. आज सलग सातव्या दिवशी पाचशेहून अधिक रूग्णांची नोंद झाली आहे.

पुण्यात आज दिवसभरात 617 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यापैकी ससून 18, नायडू 365, खाजगी 234 रूग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 16 हजार 742 वर पोहचली आहे.

पुण्यात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 6195 एवढी आहे. शहरातील 482 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून यात नायडू-पुणे महापालिका 326, खासगी रुग्णालय 132 आणि ससूनमधील 24 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, पुण्यात 333 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 61 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्रातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला

विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आजही 5 हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद, जाणून घ्या आजची कोरोना आकडेवारी

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या