बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंदोरीकर महाराजांनी थोडा संयम ठेवावा- राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर | ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. असे असले तरी अनेक राजकीय नेते त्यांच्या समर्थनासाठी पुढे आहे आहेत. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिला आहे.

इंदोरीकर महाराजांबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांचे समाज प्रबोधनाचे फार मोठे काम आहे, मात्र समाज प्रबोधन करताना त्यांनी थोडा संयम ठेवावा. त्यांचा देवच त्यांच्या पाठिशी उभा राहिल, असं विखे म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.

सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात केलं होतं. त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला असून यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

दरम्यान, इंदोरीकरांनी आज शेवटच्या दिवशी नोटीशीला उत्तर पाठवलं आहे. यात त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे समजू शकलेलं नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

“अबला नको सबला बन…हैवानांच्या छाताडावर पाय रोवून उभी रहा”

इंदोरीकर महाराजांचं शेवटच्या दिवशी नोटीसला उत्तर, पण…

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यासांठी 15 हजार कोटींचा आकस्मिक निधी, तर साडेनऊ लाख विद्यार्थ्यांना चष्मा वाटप

जीवाची पर्वा न करता तिरंगा वाचवणाऱ्या कुणाल जाधवांचा सत्कार

स्वगृही परतण्याच्या चर्चांवर राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं वक्तव्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More