माणसं बघितली की मी थरथर कापायचो- राज ठाकरे

मुंबई | शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेतही कधी भाग घेतला नव्हता, माणसं बघितली की थरथर कापायचो, अशी आठवण मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सांगितली. एबीपी माझ्याच्यावतीने बालदिनानिमित्ती एेसपैस गप्पा राजकाकांशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमावेळी चिमुकल्यांनी राज ठाकरेंना विविध प्रश्न विचारले त्या प्रश्नांची राज ठाकरेंनी तेवढ्याच उत्साहात उत्तरे दिली.

पूर्वी वर्गातले मित्र स्वरराज अशी हाक मारायचे, आता तेही बंद झालं. स्वरराज या नावाने मार्मिकमध्ये व्यंगचित्र काढायचो, शाळेत असताना चित्रकला आवडता विषय होता, त्यानंतर मराठी, इतिहास भूगोल आणि हिंदी आवडता विषय होता. दहावीला मला फक्त ३७ टक्के मिळाले होते. शाळेत असताना खूप खोट बोलायचो पण आता सरकार बोलत तसं नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारताच्या महिलांचा क्रिकेटनंतर फुटबॉलमध्येही बोलबाला; केली एेतिहासिक कामगिरी

-दुष्काळग्रस्तांसाठी मनसे मैदानात; सरकारला जागं करण्यासाठी ‘दंडुका’ मोर्चा काढणार!

-तृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी

-दिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा

-मोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार!