बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं”

पुणे | मागच्या महिन्यात महाराष्ट्रातील विविध भागात परतीच्या पावसाने अक्षरश: हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आता संभाजी ब्रिगेड ही संघटना पुढे सरसावल्याचं पाहायला मिळत आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील खरीप हंगाम हा पुर्णपणे वाया गेला त्यामुळे आता संभाजी ब्रिगेडने धर्मादाय सहआयुक्तांकडे अर्ज केला आहे. या अर्जामध्ये देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेत मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावं, अशी विनंती केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रदिप कणसे यांनी या अर्जाद्वारे ही विनंती केली आहे. तसेच यापुर्वी जेजूरी येथील मार्तंड देवस्थान ट्रस्टनेही या पुर्वी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्यावेळी मदत केली असल्याचा उल्लेखही या अर्जामध्ये करण्यात आला असून विनंतीची तात्काळ स्वरूपात गंभीर दखल घ्यावी, असं देखील नमूद केलं आहे.

संभाजी ब्रिगेडने केलेल्या या मागणीला आता धर्मादाय आयुक्त नेमकं काय उत्तर देणार आणि काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी संभाजी ब्रिगेड धावून आल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘मी हे खपवून घेणार नाही’; क्रांती रेडकर कडाडली

ऐन दिवाळीच्या तोंडावर ST बसेस राहणार बंद?, वाचा नेमकं कारण काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, सर्व पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द

देशात का होतेय डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत घट?, वाचा सविस्तर

‘हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, इथे अधिकारी तुझी…,’ समीर वानखेडेंनी अनन्याला सुनावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More