“वेडा माणूस इकडे तिकडे फिरत आहे, जेलमधे जाणार असून त्याचा रस्ता शोधत आहेत”
मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी उद्धव ठाकरे व मनिषा रवींद्र वायकर यांच्या नावावर 19 बंगले असल्याचा आरोप केला होता. या 19 बंगल्यांचा शोध घेण्यासाठी किरीट सोमय्या कोर्लईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेनंतर सोमय्या व राऊत यांच्यात कलगीतूरा रंगलेला पाहायला मिळत आहे. त्यात सोमय्यांच्या कोर्लई दौऱ्यावरून संजय राऊतांनी टीकेची झोड उठवली आहे.
कोण आहे किरीट सोमय्या?, वेडा माणूस इकडे तिकडे फिरत आहे, ते जेलमध्ये जाणार असून त्याचा रस्ता शोधत आहेत. ते इथे तिथे पळत आहेत. येथील जनता त्यांची धिंड काढेल, वेट अँड वॉच, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान, सोमय्यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. ते कुठे जातात, बंगले शोधतात ही काय बातमी आहे का?, अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“अलिबागचे जावई आहात जावयासारखं या, उन्माद करू नका अन्यथा…”
नॉनव्हेज प्रेमींनो सावधान, बर्ड फ्लूचे पुन्हा थैमान
“मी मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो”
“आदित्य ठाकरेंवर मानसिक परिणाम झालेला आहे”
तुम्हालाही ‘या’ चुकीच्या सवयी असतील तर आजच बंद करा, होऊ शकतात गंभीर आजार
Comments are closed.