सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकली लग्नबंधनात, फोटो शेअर करत म्हणाली…
मुंबई | आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांना भूरळ पाडणारी मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोनाली कुलकर्णीचं यावेळेस चर्चेत येण्याचं कारणही अगदी खास आहे.
सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सोनालीने तिचा नवरा कुणालसोबत (Kunal) आणखी एकदा लग्न केलं आहे.
सोनाली आणि कुणालने 7 मे 2021 रोजी दुबईत लग्न केलं होतं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरच्यांच्या वर्च्युअल उपस्थितीत सोनाली व कुणालने रजिस्टर पद्धतीने लग्न केलं होतं. त्यामुळे यंदा लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली व कुणालने सहकुटुंब सहपरिवार, अगदी विधीपुर्वक आणि मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं आहे.
दरम्यान, सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर सोनाली कुणाल असं लिहिलेली एक पोस्ट शेअर केली आहे. सोबत काय झालं, कसं झालं, कुठे झालं सगळं सगळं लवकरंच शेअर करू, असंही सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
उत्तर कोरियात दोन वर्षांनी कोरोना रूग्ण आढळताच किम जोंगने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
मोठी बातमी! संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची घोषणा
“माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जा”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा
मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी मनसेची तुफान टोलेबाजी, ‘टोमणे सभा’ म्हणत शिवसेनेला पुन्हा डिवचलं
गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार, असा होता रमेश लटकेंचा भन्नाट राजकीय प्रवास
Comments are closed.