बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानमध्ये जन्मलेल्या आर्शी खानला सतावतेय नातेवाईकांची चिंता, म्हणाली…

मुंबई | ‘बिग बाॅस 6’ मध्ये झळकलेली अभिनेत्री आर्शी खान ही मुळची अफगाणिस्तान येथील आहे. मात्र अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहून लोकांना जमेल त्या मार्गाने देश सोडायचा आहे. असं असतानाच आर्शीचे अनेक नातेवाईक देखील अफगाणिस्तानमध्ये आहेत. याचकारणामुळे तिला तिच्या नातेवाईकांची चिंता सतवत असल्याचं तिने सांगितलं आहे.

आर्शी खानचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला आहे. जन्माच्या काही काळानंतर ती तिच्या परिवारासह भारतात स्थलांंतर झाली. मात्र अजूनही आर्शीचे अनेक नातेवाईक अफगाणिस्तानमध्ये आहेत. तसेच अफगाणिस्तानची सध्या स्थिती पाहता आर्शीला तिच्या नातेवाईकांची चिंता लागली असल्याचं आर्शीने सांगितलं आहे.

याबाबत बोलताना मी मुळची अफगाणी पठाण असून तेथील परिस्थिती पाहून मला भिती वाटत असल्याचं आर्शीने म्हटलं आहे. एवढंच नाही तर तिचे मित्र आणि नातेवाईक तिथे अडकले असल्याचं देखील तिनं सांगितलं आहे. आपली चिंता व्यक्त करताना आपल्याला तेथील महिलांची काळजी वाटत असल्याचं आर्शीने सांगितलं आहे

दरम्यान, आर्शीला वाटत असलेल्या काळजीमुळे ती जेवण देखील करत नसून ती तिच्या परिवारासोबत अफगाणिस्तानमधल्या नागरीकांसाठी तसेच तिच्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करत असल्याचं तिने म्हटलं आहे. आर्शी लवकरच ‘बिग बाॅस15’ ओटीटीवर दिसणार आहे.

थोडक्यात बातम्या-

हातात बंदुका घेऊन इलेक्ट्रिक कार चालवताना दिसले तालिबानी, व्हिडीओ व्हायरल

‘विजय डोक्यात जाऊ देऊ नका’; मोदींचा ऑलिम्पिक विजेत्यांना कानमंत्र

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

“बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या”

शिवसेनेला धक्का! ‘या’ मोठ्या नेत्याची आमदारकी धोक्यात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More