Top News देश

‘राज्य सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय म्हणजे मूर्खपणा’; खासदार संभाजीराजेंची टीका

नवी दिल्ली |  राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास 12,538 पदांची भरती होणार आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मात्र  राज्य सरकारच्या या निर्णयावर खासदार छत्रपती  संभाजीराजेंनी जोरदार टीका केली आहे.

महाविकास आघाडीने 12 हजार 500 जागांच्या पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा असल्याचं छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाज पेटून उठणार आहे. मराठा आरक्षणाची लढाई सुरू आहे त्यासोबतच राज्यावर कोरोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणं कितपत योग्य आहे?, असा सवालही छत्रपती संभाजीराजेंनी केला आहे.

दरम्यान, पोलीस भरतीच्या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना संधी मिळेल, असा विश्वासही अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. तसंच या भरतीसाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई काळाच्या पडद्याआड

‘उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही तर सॉफ्ट पॉर्नसाठी प्रसिद्ध’; कंगणाने उधळली मुक्ताफळं

धक्कादायक! महिलेने केला दीड वर्षाच्या बाळाला पळवण्याचा प्रयत्न

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील युवा अभिनेत्याचं निधन

“कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या