बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बहुचर्चित Hyundai Alcazar कारची प्रतिक्षा संपली; जाणून घ्या नव्या दमदार 7 सिटर गाडीचे फिचर्स

मुंबई | भारतात मोठ्या गाड्यांना चांगली मागणी असते. सध्या भारतीय बाजारपेठेत अशा अनेक आरामदायी कार उपलब्ध आहेत. पण यासर्वात Hyundai Alcazar ची शानच काही वेगळी आहे. दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Hyundai नं आपल्या 7 सीटर कार Hyundai Alcazar लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहे. यापूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत कंपनीनं कारमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे ही कार आधीच्या मॉडेलपेक्षा वेगळी आणि अधिक आकर्षक ठरते.

Hyundai कंपनी आपली बहुचर्चित कार Alcazar ला लवकरच भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून या कारची जोरदार चर्चा सुरू आहे. ही कार जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लाँच केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 17 जून रोजी ही SUV लाँच होणार आहे. कंपनी जुनमध्ये गाडी बाजारात उतरवेल, अशी माहिती कंपनीने दिली होती. परंतू देशातील काही भागात लाॅकडाऊन असल्यानं लाँचिंगची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.

एसयूव्ही 7-सीटर आणि 6-सीटर अशा दोन प्रकारात येईल. इंजिनसाठी पेट्रोल आणि डिझेल असे दोन पर्याय मिळतील. पेट्रोल व्हेरियंटमध्ये 2.0 लिटर क्षमतेचे इंजिन असणार आहे. ह्युडाई अल्काझरमध्ये अँड्रॉइड आणि ॲपल कारप्लेला सपोर्ट करणारी 10.25 इंचाची टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम असणार आहे. तर माउंटेड सीट, हिल स्टार्ट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन, असे अनेक फिचर्स मिळतील.

दरम्यान, कोरोना पहिल्या लाटेनंतर लोकांना काही काळ वेळ मिळाला होता. त्या काळात सर्वाधिक कार विक्री नोंद करण्यात आली होती. त्यामुळे आता दुसऱ्या लाटेनंतर देखील ही कार घेण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गाडीची किंमत 13 ते 20 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. या बद्दल कंपनीने अद्याप घोषणा केलेली नाही. परंतू गाडीच्या दमदार फिचरमुळे ही गाडी बाजार धुमाकूळ घालणार यात काही वाद नाही.

थोडक्यात बातम्या-

हैराण करणारी बातमी! HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस राहिला कोरोनाचा विषाणू

शिवकालीन ‘होन’च्या साक्षीने साजरा होणार यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा; संभाजीराजेंनी शेअर केला दुर्मिळ फोटो

आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ; डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी रुग्ण पुन्हा कोरोना पाॅझिटिव्ह

नागपूरकरांना मोठा दिलासा; कोरोना पाठोपाठ काळ्या बुरशीचे रुग्णही घटले

“नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे मोदींशी चांगले संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More