Top News पुणे महाराष्ट्र

‘त्या’ पीडितेचा आत्महत्या करण्याचा इशारा; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या अडचणी वाढणार?

photo Credit- Facebook | Ncp

पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ घातली असताना अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरूणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला इशारा दिला आहे.

मला न्याय मिळाला नाही तर मी पाच दिवसाच्या आत आत्महत्या करणार. इतकंच नाही तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील, असं पीडित तरूणीने म्हटलं आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आणि पीडित तरुणीने पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या.

औरंगाबाद शहरातील बायजीपुरा राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणार्‍या 29 वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर करण्यात आला होता. मात्र मेहबूब शेख यांनी बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. मात्र आता पीडित तरूणीने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला इशारा दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना शेख यांनी आपण निर्दोष असून माझी नार्को टेस्ट करण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी मेहबूब शेख यांना पत्रकार परिषदेत रडू आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘ज्या चेहऱ्यावर तू घमंड करते त्यावर अ‌ॅसिड टाकून…’; शिवसेनेच्या लेटरहेडवरून धमकी आल्याचा नवनीत राणांचा आरोप

पुन्हा लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा”

“एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे”

भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या