नवी दिल्ली | जगातील सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागलेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 30 मे पासून म्हणजे अवघ्या दोन दिवसानंतर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला इंग्लंडमध्ये सुरूवात होणार आहे.
30 मे ला विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार असली तरी भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार आहे.
भारतीय संघाचा दूसरा सामना 9 जूनला ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे. तसेच 13 जूनला न्यूझीलंडविरूद्ध तर 16 जूनला पाकिस्तानविरूद्ध ‘काँटें की टक्कर’ पहायला मिळणार आहे. 22 जूनला भारत विरूद्ध अफगाणिस्तान अशी लढत होणार असून 27 जूनला भारत वेस्टइंडिजला टक्कर देईल. 2 जुलैला भारत विरूद्ध बांगलादेश आणि 6 जुलै रोजी भारत विरूद्ध श्रीलंका असे सामने होणार आहेत.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची पहिली मॅच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणार आहे. यंदाच्या विश्वचषकमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, विंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे संघ सहभागी होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
-अखेर लालूप्रसाद यादवांनी जेवणं घ्यायला केली सुरूवात!
-अजित पवार आणि वळसे पाटलांचा प्रचारात किती वाटा होता?? डॉ. अमोल कोल्हे म्हणतात…
-पवार, ठाकरे, वळसे पाटील, आढळराव यांच्याकडून काय शिकलात??? डॉ. अमोल कोल्हे म्हणतात…
-“राज ठाकरेंच्या घराशेजारी राहणाऱ्यांनीही त्यांचं ऐकलं नाही”
-निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या मदतीवर सुप्रिया सुळे म्हणतात…
Comments are closed.