बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑस्ट्रेलिया दौऱ्याअगोदरच टीम इंडियाची चिंता वाढली, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

नवी दिल्ली | आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. मात्र टीमच्या अडचणींमध्ये काहीश्या प्रमाणात वाढ झालीये कारण अनेक खेळाडू दुखापतीने ग्रस्त आहेत.

तर दौऱ्यावर जाण्याआधीच टीमला एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या ऋद्धीमान साहाला हॅमस्ट्रिंग दुखापत झालीये. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना त्याला ही दुखापत झाली.

हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ऋद्धीमानच्या दुखापतीबाबात माहिती दिली. वॉर्नर म्हणाला, “ऋद्धीमान अजून दुखापतीतून सावरला नाहीये. त्याला हॅमस्ट्रिंग दुखापत झालीये.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सामन्यांना 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. साहा जर दुखापतीमुळे टेस्टमध्ये खेळू शकला नाही तर टीमची चिंता वाढू शकते. अशावेळी पर्यायी विकेटकीपर म्हणून रिषभ पंतला संधी देण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

इतिहासात अर्णबला हिरो म्हणून ओळखलं जाईल- कंगणा राणावत

अन्वय नाईकप्रकरण आधीच्या सरकारने दाबलं- जयंत पाटील

‘…तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही सोडणार नाही’, मराठा आंदोलकांचा इशारा

“मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंत लोकांची समिती स्थापन करा”

“सुशांत सिंह बद्दलची भावना भाजप नेत्यांना अन्वय नाईक यांच्याबद्दल का वाटत नाही?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More