बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ATMमधून पैसे काढताय! मग जाणून घ्या ‘ही’ नवीन नियमावली

मुंबई | बॅंकेच्या सुविधांची व्यवस्थापकीय मंडळांकडून सातत्यानं पाहणी होत असते. ग्राहक (Cutemers) आणि बॅंकेमध्ये (Banks) एका नियमावलीच्या आधारावर व्यवहार होत असतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं प्रत्यक्षात बॅंकेत जाण्याऐवजी एटीएममधून (ATM) पैसे काढण्यावर ग्राहक भर देत आहेत. परिणामी विविध बॅंकांनी आपापले एटीएम वापराबाबतचे नियम बदलले आहेत.

भारतीय स्टेट बॅंक ही अग्रगण्य बॅंक म्हणून गणली जाते. एसबीआय बॅंकेला (SBI Bank) सर्वाधिक विश्वासार्ह बॅंक म्हणून सुद्धा ओळखण्यात येतं. अशातच एसबीआयनं आपल्या ग्राहकांना एटीएम वापराच्या नवीन सुचना जाहीर केल्या आहेत. एटीएममधून रोख पैसे काढण्याच्या नियमात आता बदल करण्यात आल्याचं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे. ग्राहकांच्या खात्यातील पैसे सुरक्षित राहण्यासाठी एसबीआयनं हा पर्याय स्विकारला आहे.

जर ग्राहकांना रोख रक्कम 10 हजार रूपये आपल्या खात्यातून एटीएमद्वारे काढायचे असतील तर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाईल जो ओटीपी ग्राहकांना एटीएम मशीनवर टाकावा लागेल. या प्रक्रियेनंतर ग्राहकांना 10 हजार रूपयांच्यावरची रक्कम खात्यातून काढता येणार आहे. ग्राहकांच्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर एसबीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, एसबीआयकडून 2020 सालीच अशाप्रकारची प्रणाली लागू करण्यात आली होती. पण रोख रक्कम काढण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. परिणामी या बदलाचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

थोडक्यात बातम्या 

राष्ट्रपतींच्या सहीसह कृषी कायदे रद्द, पण शेतकरी ‘या’ मागणीवर ठाम

“भाजप हा पक्ष जाता-जाता सर्वकाही विकून जाईल”

पेच नव्या संघनायकाचा! कोहलीनंतर ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर RCBची धुरा?

पुण्यात दिवसभर संततधार पाऊस; राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

“ममता बॅनर्जी जेव्हा सातवीत होत्या तेव्हा शरद पवार…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More